उचला मोबाईल आणि करा स्माईल विथ सकाळ!

रविवार, 4 मार्च 2018

सत्त्याऐंशी वर्षांची परंपरा आता तरुणाईच्या हाती देण्याची वेळ आली आहे. मोठ्यांचे मार्गदर्शन तर नेहमी मोलाचे आहेच. पण 'सकाळ'चे पडते पाऊल आता तरुणाईच्या सोबत मार्गक्रमण करण्यास सज्ज झाले आहे.

सेल्फीप्रिय असलेल्या लोकांचा समुह आज खुप मोठा आहे. यातले तर काही पार सेल्फीवेडेही आहेत. पण नुस्तीच सेल्फी काढून आपल्याकडे संग्रह करण्यात तोच तो पणा आलाय असं नाही वाटत आपल्याला? म्हणजे त्या सेल्फीला जर योग्य प्लॅटफॉर्म मिळालं तर किती छान नाही का! पण ही संधी मिळणार कुठे? आणि ही संधी देणार कोण?
smile with sakal
आपल्या लोकांना संधी नाही तर साथ दिली जाते. 'सकाळ' घेऊन येत आहे स्माईल विथ सकाळ हे कॅम्पेन फक्त आपल्या माणसांचं हास्य साऱ्या जगापर्यंत पोहोचविण्यासाठी. मग उचला मोबाईल आणि करा स्माईल! तुमचे हसरे फोटो sakalsmiles@gmail.com वर आम्हाला पाठवा. किंवा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर #SmileWithSakal हा हॅशटॅग वापरुन आपला हसरा फोटो शेअर करा. लवकरच #SmileWithSakal  'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होईल. सत्त्याऐंशी वर्षांची परंपरा आता तरुणाईच्या हाती देण्याची वेळ आली आहे. मोठ्यांचे मार्गदर्शन तर नेहमी मोलाचे आहेच. पण 'सकाळ'चे पडते पाऊल आता तरुणाईच्या सोबत मार्गक्रमण करण्यास सज्ज झाले आहे. याची सुरवात नवीन जोशाच्या आपल्यासारख्या हजारो युवा चेहऱ्यांवर गोड हास्याने व्हावे या हेतूने स्माईल विथ सकाळ हे कॅम्पेन राबविले जात आहे.  
smile with sakal

 

Web Title: marathi news smile with sakal campaign youth social media