मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियान लवकरच सुरू होणार

Tatyarao-Lahane
Tatyarao-Lahane

माढा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य अठरा महिन्यात मोतीबिंदूमुक्त करण्याच्या महत्त्वकांक्षी अभियानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून राज्यातील 344 केंद्रात 350 नेत्ररोगतज्ज्ञ दररोज दहा मोतीबिंदू शस्त्रक्रीय करणार असून आठरा महिन्यात सुमारे सोळा लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानाचे समन्वयक पद्मश्री डॅा. तात्याराव लहाने यांनी दैनिक सकाळशी बोलताना सांगितले.

अभियानाची पूर्वतयारी - 
महाराष्ट्रातील मोतीबिंदू रुग्णांची संख्या सुमारे सतरा लाख - 
1) महाराष्ट्रातील सात जिल्हयातील विविध तालुक्यात महाआरोग्य शिबीरे घेवून आलेल्या रुग्णांच्या संख्येवरून राज्यभरातील रुग्णांच्या संख्येचा अंदाज घेतला. 
2) प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फतही रुग्णांची संख्या घेतली जाते. 

रुग्णांचे वर्गीकरण -  
1) दोन्ही डोळयांनी अंध 
2) एका डोळयाला मोतीबिंदू असलेले
3) दोन्ही डोळयांना मोतीबिंदू असेलेल 
4) पिकलेला मोतीबिंदू असलेले रुग्ण

जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व जिल्हयातील आरोग्य विभाग, अशासकीय सेवाभावी संघटना यांच्या बैठका घेऊन अभियानाची माहिती देऊन पूर्वतयारी केली. 
महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी डॅा. तात्याराव लहाने यांनी भेटी देवून ऑपरेशन थिएटर व संबंधीत स्टाफ यांची माहिती घेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या.

अभियानासाठी राज्यात उपलब्ध ऑपरेशन थिएटर - 344

1) अशासकीय संघटना - 108  
2) शासकीय वैद्यकीय  विभाग - 153  
3) नगरविकास  विभाग -  83

अभियानासाठी राज्यातील उपलब्ध नेत्ररोगतज्ञांची संख्या - 350 

डॅा. तात्याराव लहानेंनी आखलेला कार्यक्रम - 
प्रत्येक नेत्ररोगतज्ज्ञाने रोज दहा याप्रमाणे महिन्यातील पंचवीस दिवसात 250 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायच्या अशा महिन्यात साधरणपणे 87 हजार 500 याप्रमाणे आठरा महिन्यात पंधरा लाख 75 हजार शस्त्रक्रिया होणार आहेत. यापूर्वीच अभियानच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून हाती घेतलेल्या कार्यक्रमात सुमारे एक लाख शस्त्रक्रीया केलेल्या आहेत. त्यामुळे उर्वरीत सुमारे सोळा लाख शस्त्रक्रीया वरील नियोजनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. 

अभियानाचे मॅानिटरींग - 
डॅा. तात्याराव लहाने यांनी जिल्हानिहाय नेत्ररोगतज्ज्ञांचे व्हॅाटसॅप ग्रुप तयार केले असून दररोज शस्त्रक्रीया केलेल्या रुग्णांचे फोटो ग्रुपवर टाकायचे आहेत. त्यामुळे राज्यातील दररोज होणाऱ्या शस्त्रक्रियांचा आकडा मिळणार असून यावरून अभियानाची गती लक्षात येणार असून आवश्यक तेथे काम वाढविण्याबाबत उपाययोजना करता येणार आहेत. 

या अभियानाचा शुभारंभ मंगळवारी (ता. 30) मुंबईत मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com