राज्यात आजपासून दहावीची परीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा उद्यापासून (ता. 1) सुरू होत आहे. राज्यभरातून 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत; मात्र लेटलतीफ दहावीच्या विद्यार्थ्यांनाही बोर्डाच्या नव्या नियमाचा फटका बसू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेस येण्याची 11 पर्यंतची वेळ पाळावी, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. 

बारावीच्या परीक्षेत व्हॉट्‌सऍपवरून पेपर फुटल्यानंतर यंदा बारावीच्या परीक्षांसाठी बोर्डाने तयार केलेला वेळेबाबतचा नियम दहावीच्या विद्यार्थ्यांनाही लागू झालेला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 11 नंतर परीक्षा केंद्रात येण्यास मज्जाव केला जाईल. अपरिहार्य कारणास्तव 11 वाजून 10 मिनिटांनी आलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र संचालकांच्या आणि 11 वाजून 20 मिनिटांनी येणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागीय बोर्डाच्या परवानगीने परीक्षेस बसता येईल. 

17 लाख 51 हजार 353  - परीक्षार्थी 
4,657  - परीक्षा केंद्रे 

Web Title: marathi news ssc exam maharashtra