आत्महत्येच्या भीतीने विधानभवनाच्या सुरक्षेत वाढ 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई - मंत्रालय आणि परिसरात झालेल्या आत्महत्या, तसेच आत्महत्येचे प्रयत्न लक्षात घेऊन विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान अशी घटना घडू नये म्हणून विधानभवनाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत आत्महत्येचा प्रयत्न होऊ शकतो, असा गुप्त अहवाल पोलिसांना प्रप्त झाल्याने विधानभवन परिसराची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. 

धुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील आणि एका हत्येच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या हर्षल रावते या तरुणाने मंत्रालयात आत्महत्या केल्याने सरकार चांगलेच हबकले आहे. मंत्रालयात यापुढे कुणी उडी मारून आत्महत्या करू नये म्हणून मुख्य इमारतीमधील त्रिमूर्ती प्रांगणात सुरक्षा जाळी बसविण्यात आली आहे. विरोधी पक्षाने आत्महत्येच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. 

मंत्रालयातील दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती अधिवेशनाच्या दरम्यान होऊ शकते. आत्महत्येचा प्रकार घडल्यास त्याचे गंभीर पडसाद अधिवेशनात उमटणार हे निश्‍चित आहे. यामुळे अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Web Title: marathi news suicide vidhanbhavan security