विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा  पारा पोहचला चाळीशीच्या पुढे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

नाशिक : राज्यात यंदा मार्चच्या अखेरच्या टप्प्यात उष्णता अन्‌ उकाडा वाढण्यास सुरवात झाली. आज निम्मा महाराष्ट्र तापला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तेरा ठिकाणी पारा चाळीशीच्या पुढे पोचला.

नाशिक : राज्यात यंदा मार्चच्या अखेरच्या टप्प्यात उष्णता अन्‌ उकाडा वाढण्यास सुरवात झाली. आज निम्मा महाराष्ट्र तापला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तेरा ठिकाणी पारा चाळीशीच्या पुढे पोचला.

अकोलामध्ये सर्वाधिक 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून त्याखालोखाल नगरमध्ये 41.5, मालेगावमध्ये 41.4 अंश सेल्सिअस तापमान राहिले. 
पारा चाळीशीच्या पुढे पोचलेल्या ठिकाणी नोंदवण्यात आलेले तापमान अंश सेल्सिअसमध्ये असे ः जळगाव-40.8, सोलापूर- 40.7, परभणी- 41.2, नांदेड- 40, अमरावती-40.4, चंद्रपूर-41.2, नागपूर-40.2, वाशिम-40.2, वर्धा-40.9, यवतमाळ-40.5. इतर भागातील किमान तापमान याप्रमाणे ः मुंबई- 31.6, अलिबाग- 33, रत्नागिरी-32.8, डहाणू-32.6, भिरा-41, पुणे- 38.7, कोल्हापूर-371, महाबळेश्‍वर-32.4, नाशिक-38.5, सांगली-38.4, सातारा-39.1, उस्मानाबाद-39.3, औरंगाबाद-38.3, बुलढाणा-39.6, 
गोंदिया-38.5. दरम्यान, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी 30 आणि 31 मार्चला उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता पुण्याच्या भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. शिवाय विदर्भाच्या काह भागात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या चार दिवसांमध्ये गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता विभागाने वर्तवली आहे. 

देशातील चाळीशीच्या पुढील तापमान 
(आकडे अंश सेल्सिअसमध्ये) 
0 अहमदाबाद- 40.5 
0 बल्लारी- 40 
0 भूज- 40.4 
0 गुलबर्गा-40.3 
0 कर्नूल-40.6 
0 राजकोट-40.6 
0 वडोदरा-40.7 

Web Title: marathi news temperature in maharashtra