खासगी क्‍लासेसवर चाप लावत असतांना क्लासचालक-सत्ताधाऱ्यांची सलगी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

खासगी क्‍लासेसवर चाप लावत असतांना क्लासचालक-सत्ताधाऱ्यांची सलगी
नाशिक : सर्वसामान्य विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळावा या हेतूने खासगी क्‍लासेसच्या मनमानीवर निर्बंध आणणारा कायदा प्रस्तावित असताना रविवारी येथे क्‍लासचालकांच्या मेळाव्यात सत्ताधारी भाजपच्या खासदार, आमदारांनी हजेरी लावली. खासगी क्‍लासचालकांनीही सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधताना शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापासून अनेकांची छायाचित्रे अधिवेशनासाठी वापरली; परंतु मंत्री अधिवेशनाकडे फिरकले नाहीत. 

जागा व अन्य सुविधांचा अभाव असतानाही मनमानी शुल्कआकारणी, विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार यामुळे खासगी क्‍लासेसवर निर्बंध असावेत, अशी मागणी सातत्याने होत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये विधिमंडळात यावरून गदारोळ झाला होता. तेव्हा, क्‍लासेसवर नियंत्रण आणणारा कायदा केला जात असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले होते. 

या पार्श्‍वभूमीवर, शहरालगत महिरावणी येथील संदीप फाउंडेशनच्या प्रांगणात क्‍लासचालक संघटनेचा मेळावा रविवारी झाला. कार्यक्रमास संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांच्याशिवाय खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, तसेच प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे या भाजपच्या आमदारांनी हजेरी लावली. 

संघटनेचे राज्याध्यक्ष बंडोपंत भुयार यांनी या मेळाव्यात प्रस्तावित कायद्याच्या अनुषंगाने कोचिंग क्‍लासचालकांना संघटित होण्याचे आवाहन केले. आजीव सदस्य वाढवावेत, नियमित सदस्यत्व शुल्क भरावे अशा सूचना त्यांनी केल्या. प्रस्तावित कायद्यात स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले जाणार असल्याने संघटनेकडे नोंदणी केली नाही, तर व्यवसाय करता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयंत मुळे या वेळी उपस्थित होते. 

क्‍लासचालकांची बाजू शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी आपण व्यक्‍तिश: प्रयत्न केल्याचे सांगून आमदार देवयानी फरांदे यांनी, कायद्याचा मसुदा तयार होत असताना शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाने बोलावलेल्या बैठकीसाठी क्‍लासचालक उपस्थित राहिले नसल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली. आपल्यासाठी भांडत असलेल्या लोकप्रतिनिधींचा सन्मान क्‍लासचालकांची संघटना करीत नसल्याचे त्या म्हणाल्या. 
 
Web Title: marathi news tution class adhivashan