वंदना चव्हाण यांचा राज्यसभेसाठी अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यसभेसाठी खासदार वंदना चव्हाण यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी (ता. ८) विधान भवन येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या आठवड्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आज हा अर्ज दाखल करण्यात आला. दरम्यान, शिवसेनेकडून विद्यमान खासदार अनिल देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला; तर भाजपकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

Web Title: marathi news Vandana Chavan rajya sabha maharashtra NCP