'जल-वायू कायद्यानुसार 165 कारखान्यांवर कारवाई'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई  - तळोजा एमआयडीसीतील प्रदूषण करणाऱ्या एकूण 165 कारखान्यांवर जानेवारी 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत जल आणि वायू कायद्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी (ता. 28) विधिमंडळात लेखी उत्तरात दिली. वसाहतीमधील नाल्यांमध्ये टॅंकरद्वारे घातक रसायन टाकणाऱ्या एका टॅंकरचालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही कदम यांनी या वेळी सांगितले. 

सरकारने चौकशी करून प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या या औद्योगिक वसाहतीतील किती कारखाने आणि रसायने टाकणाऱ्या टॅंकरधारकांवर कारवाई केली किंवा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्‍न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचारला होता. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांतून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. त्यात आणखी भर म्हणून इतर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांतील घातक रसायने तळोजा येथील नदी-नाल्यांमध्ये टॅंकरद्वारे सोडण्यात येत आहेत. त्यामुळे एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. कारखाने रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडत असल्याने सीईटीपी केंद्रावर ताण येत असल्याचे डिसेंबर 2017 मध्ये "एमपीसीबी'च्या संकेतस्थळावरील अहवालातून स्पष्ट झाले आहे. याबाबत सरकारने चौकशी करून प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे कारखाने आणि टॅंकरधारकांवर कारवाई केली, याची माहिती आमदार ठाकूर यांनी मागितली होती. 

तळोजा एमआयडीसीतील प्रदूषण करणाऱ्या एकूण 165 कारखान्यांवर जानेवारी 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत कारवाई करण्यात आल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

Web Title: marathi news water pollution ramdas kadam