मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात  मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

"क्‍यार'ची तीव्रता कमी, "महा' चक्रीवादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रावर 
पुणे - अरबी समुद्रावरील "क्‍यार' चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली असून, त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. तसेच, लक्षद्वीपसह लगतच्या अरबी समुद्रावरील "महा' चक्रीवादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रावर घोंगावत आहे. परिणामी राज्यात शनिवारी (ता. 2) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. 

गेल्या 24 तासांत कोकण- गोवा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर, मराठवाड्यात काही भागांत किंचित घट झाली आहे. 

"क्‍यार' चक्रीवादळ अरबी समुद्रावर आल्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांत तटवर्ती भागातील मुंबई-पुणे शहरातील भागात पाऊस झाला. त्यानंतर "महा' चक्रीवादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रावर आले आहे, त्यामुळे पुण्यासह राज्यात पाऊस होत आहे. "महा' चक्रीवादळ गोव्यापासून 310 किलोमीटर अंतरावर आहे, येत्या सहा तासांत अरबी समुद्राच्या तटवर्ती भागात धडकणार आहे. त्याचा परिणाम गोव्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जाणवेल. सायंकाळी सहा वाजल्यानंतर येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे. 

पाऊस कधी बंद होणार, हे सांगणे अशक्‍य 
"क्‍यार' आणि "महा' चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरात 3 नोव्हेंबर रोजी "बुलबुल' चक्रीवादळ दाखल होण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. सात नोव्हेंबरनंतर पाऊस कमी होईल. परंतु यंदाचा पाऊस कधी परतणार, हे सांगणे आता शक्‍य नाही, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक अनुपम काश्‍यपी यांनी दिली. 

पुण्यात ऑक्‍टोबरमध्ये उच्चांकी पाऊस 
पुणे शहरात या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात उच्चांकी 235 मिलिमीटर पाऊस झाला आहे. 2010 मध्ये पुण्यात सर्वाधिक उच्चांकी 262.8 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर 2011 मध्ये 200.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada and Central Maharashtra Chance of heavy Rain