Maratha Kranti Morcha : महाराष्ट्र ठप्प

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

राज्यभरात कडकडीत बंद; औरंगाबाद, पुण्यात दगडफेक
मुंबई - सकल मराठा क्रांती मोर्चाने हाक दिलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने अख्खा महाराष्ट्र आज ठप्प झाला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई वगळता संपूर्ण राज्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. एकही शाळा- महाविद्यालय उघडण्यात आले नाही. तसेच, रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाची एकही एसटी बस आज धावली नाही. पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वे वर पहिल्यांदाच शुकशुकाट होता. पुणे, औरंगाबादमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या.

 • औरंगाबादला वाळूज वसाहतीत दोन कंटेनर, एक पोलिस व्हॅन पेटवली, पोलिसांकडून सहा राउंड हवेत गोळीबार, अश्रुधुराचा वापर 
 • वारंगा, शेवाळा (ता. कळमनुरी) येथे रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा 
 • उस्मानाबादेत आंदोलनस्थळी तीनशे जणांचे रक्तदान 
 • जागोजागी रेल्वेगाड्या थांबविल्या 
 • एकही एसटी बस धावली नाही
 •  हिंजवडीचे आयटी पार्कही थांबले 
 • शिर्डीजवळील पिंपरी निर्मळ गावात नगर - मनमाड मार्गावरच स्वयंपाक व जेवण करून आंदोलन
 • मुंबई- पुणे एक्‍सप्रेस वे पहिल्यांदाच सुमारे सहा तास बंद 
 • बारामतीत शरद पवारांच्या निवासस्थानासमोर आंदोलकांचा ठिय्या, अजित पवारही सहभागी
 • अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये तेजस्विनी गावंडे व अभिमन्यू अाढाव यांचे आंदोलन स्थळीच लग्न
 • पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न; चांदणी चौकात दगडफेक, पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
Web Title: Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh