"लेटकमर्स' विद्यार्थ्यांवर करडी नजर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

मुंबई - बारावी परीक्षेचे पेपर व्हॉट्‌सऍपद्वारे व्हायरल होत असल्याने हैराण झालेल्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 वाजता पेपर सुरू झाल्यानंतर येणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. आज गणिताचा पेपर व्हॉट्‌सऍपवर व्हायरल झाल्याने मंडळाची नाचक्की झाली आहे. 

मराठीचा पेपर व्हॉट्‌सऍपवर फुटल्यानंतर सेक्रेटेरियल प्रॅक्‍टिस (एसपी) आणि गणिताचा पेपर मुंबईतून फुटल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शनिवारी (ता. 4) दुपारी राज्यशास्त्राचा पेपर लातूरमधून फुटला. सलग पेपर फुटल्याने यामागील सूत्रधाराला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. शनिवारपासून पोलिसांच्या कारवाईला वेग आला असला, तरीही सोमवारी गणिताचा पेपर व्हॉट्‌सऍपवर फुटला. पेपर लिहायला सुरवात होण्यापूर्वी 10 वाजून 47 मिनिटांनी कला व विज्ञान शाखेचा गणिताचा पेपर व्हायरल झाला. त्यामुळे मुंबई विभागीय मंडळाची चांगलीच धावपळ उडाली. विद्यार्थ्यांना 15 मिनिटे आधी पेपर वाचण्याकरता द्यावा, असा नियम आहे. या 15 मिनिटांदरम्यान प्रश्‍नपत्रिका व्हॉट्‌सऍपवर पोचत असल्याने पेपरफुटीचा हा नवा पॅटर्न बोर्डाला चांगलाच तापदायक ठरत आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळेच हा प्रकार घडत असल्याचे मंडळाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी सांगितले. 

पेपर सुरू होण्याच्या तीन तास अगोदर परीक्षा केंद्रात इंटरनेट जॅमर बसवल्यास व्हॉट्‌सऍपवर पेपर फुटण्याचे प्रकार थांबवता येतील. आतापर्यंत जे पेपर फुटले ते पुन्हा घेतले जाणार नाहीत. 
- दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ. 

Web Title: mathematics paper viral on whatsapp