राष्ट्रवादीचा पाठिंबा नसला तरीदेखील नवं सरकार टिकणार?

वृत्तसंस्था
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

- राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नसला तरीदेखील फडणवीस यांचे नवं सरकार स्थिर राहू शकेल, कारण...

मुंबई : महाराष्ट्रात भाजपने अखेर अजित पवार यांच्यासोबत मिळून सरकार स्थापन केले. त्यानंतर भाजप-अजित पवार यांच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय आता याप्रकरणी उद्या (सोमवार) निर्णय देणार आहे. महाराष्ट्रात सरकार स्थिर ठेवण्याचा भाजपचा प्लॅन तयार असून, त्यानुसार आता रणनीती आखली जाणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजपने महाराष्ट्रात अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. मात्र, त्यांच्या या सरकार स्थापनेवरून राष्ट्रवादीसह शिवसेना-काँग्रेसने विरोध करत याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. यामध्ये या तिन्ही पक्षांनी भाजपला बहुमत सादर करण्यासाठी त्वरित आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर आज साडेअकराच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने यावर आपला निर्णय दिला नाही. आता उद्या यावर निर्णय देण्यात येणार आहे.

अजित पवार यांच्या सहा वर्षांतील तीन चुका; राजकीय कारकिर्द धोक्यात?

अशी होईल आकड्यांची जुळवाजुळव

भाजपकडे 105 आमदार तर 13 अपक्ष आमदार आहेत. अजित पवार यांनी आपल्या समर्थनार्थ 19 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता राज्यात सत्तेचे नवं समीकरण येऊन 105+13+19=137 संख्या होणार आहे. त्यामुळे आता भाजप आणि अजित पवार यांचा सरकार स्थापनेचा 'प्लॅन बी' तयार आहे. 

8 आमदारांची गरज

भाजप-अजित पवार यांच्याकडे आता 137 आमदारांचे पाठबळ असल्याचे समोर येत असले तरीदेखील त्यांना सरकार स्थापनेसाठी आणखी 8 आमदारांची गरज भासणार आहे. त्यानुसार आता भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: may the new government stable even if it does not have the support of the NCP