पुणे, नागपुरात "महिलाराज'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदांची आरक्षण सोडत आज मंत्रालयात काढण्यात आली. त्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी 16, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सात, अनुसूचित जातीसाठी तीन, तर अनुसूचित जमातीसाठी एक याप्रमाणे आरक्षण काढण्यात आले असून, 27 महापालिकांपैकी 14 पदे ही विविध प्रवर्गांतील महिलांसाठी आरक्षित आहेत. नव्यानेच अस्तित्वात आलेल्या 27 व्या पनवेल महापालिकेवर महापौर म्हणून विराजमान होण्याचा मान अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेला मिळणार आहे.

मंत्रालयात आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर, नवी मुंबई महापालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे, मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर गीता जैन, पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.

महाराष्ट्र महापालिका महापौरपदाचे आरक्षण, नियम 2006 आणि महाराष्ट्र महापालिका (महापौर पदाचे आरक्षण) (सुधारणा), नियम 2011 नुसार राज्यातील 27 पैकी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एक, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तीन (पैकी दोन पदे महिलांसाठी), नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सात (पैकी चार पदे महिलांसाठी) अशी महापौरपदांची आरक्षणे आहेत. उर्वरित 16 (पैकी आठ पदे महिलांसाठी) महापौरपदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी सोडत काढताना या प्रवर्गासाठी सध्या आरक्षित असलेल्या व यापूर्वी आरक्षित असलेल्या महापालिका वगळून उर्वरित महापालिका विचारात घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हे आरक्षण सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या महापालिकांसाठी असून उर्वरित महापालिकांच्या महापौरपदाची मुदत संपल्यानंतर हे आरक्षण लागू होईल, अशी माहिती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिली.

महापौरपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे-
- अनुसूचित जमाती प्रवर्ग ः नाशिक महापालिका. (एकूण एक)
- अनुसूचित जाती प्रवर्ग ः अमरावती महापालिका. (एकूण एक)
- अनुसूचित जाती प्रवर्ग (महिला) ः नांदेड-वाघाळा महापालिका आणि पनवेल महापालिका. (एकूण दोन)
- नागरिकांचा मागास प्रवर्ग ः नवी मुंबई महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, औरंगाबाद महापालिका. (एकूण तीन)
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ः मीरा-भाईंदर महापालिका, जळगाव महापालिका, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आणि चंद्रपूर महापालिका. (एकूण चार)
- सर्वसाधारण प्रवर्ग ः लातूर, धुळे, मालेगाव, बृहन्मुंबई, भिवंडी-निजामपूर, अकोला, नगर, वसई-विरार महापालिका. (एकूण आठ)
- सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) ः ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नागपूर महापालिका. (एकूण आठ).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayor announced reservations