MBBS Exam: सूक्ष्मजीवशास्त्र-१ या विषयाची होणार पुनर्परिक्षा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या MBBS या अभ्यासक्रमासाठी परिक्षा घेण्यात येत आहेत.
Exams
ExamsSakal

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या MBBS या अभ्यासक्रमासाठी परिक्षा घेण्यात येत असून काही कारणास्तव सुक्ष्मजीवशास्त्र या विषयाचा पेपर पुन्हा घेण्यात येणार आहे. असं परिपत्रक विद्यापीठाने जारी केलं आहे.

विद्यापीठाच्या हिवाळी २०२१ परिक्षेच्या MBBS द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या सूक्ष्मजीवशास्त्र-१ या विषयाची परिक्षा काल (शुक्रवारी) ४१ परिक्षाकेंद्रावर पार पडली. पण ही परिक्षा विद्यापीठाकडून रद्द करण्यात आली असून त्या विषयाची परिक्षा २६ मार्च ला घेण्याचे आदेश परिपत्रकात दिलेले आहेत. दरम्यान परिक्षा रद्द करण्यामागचं नेमकं कारण विद्यापीठाने परिपत्रकात नमूद केलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाची परिक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. दरम्यान ११ मार्च ला झालेल्या परिक्षेची प्रश्नपत्रिका आणि लातूर महाविद्यालयाच्या पूर्वपरिक्षेची प्रश्नपत्रिका ही मिळतीजुळती असल्याच्या चर्चा होत आहेत. पण विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात याबाबत कसलाच उल्लेख केलेला नाही.

या पत्रकात विद्यापीठाने, विद्यापीठ कार्यप्रणालीमध्ये असलेली पारदर्शकता व विश्वासाहर्ता कायम रहावी म्हणून या अभ्यासक्रमाची पुनर्परिक्षा घेण्यात येत असल्याचं सांगितलंय. ही पुनर्परिक्षा २६ मार्चला सकाळी १०:३० ते ०१:३० या वेळेत होणार आहे. मात्र MBBS द्वितीय वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परिक्षा होणार नाही असंही या पत्रकात म्हटलंय. त्याचबरोबर अगोदर दिलेल्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांना पुनर्परिक्षेसाठी बसण्याची मुभा विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

तसेच ११ मार्चला झालेल्या परिक्षेत अनुपस्थित असलेल्या विद्यार्थांनाही २६ मार्चच्या पुनर्परिक्षेत बसता येणार आहे. असं विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केलं आहे. त्याचबरोबर महाविद्यालयांना सदर सूचना विद्यार्थ्यांपर्यंत कळवण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com