दुसऱ्या टप्प्यातील पडताळणी १४ जुलैपासून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

मुंबई - एमबीबीएस, दंतशास्त्र यासह वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणीचे दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक राज्य संयुक्त प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १४ ते २४ जुलैपर्यंत प्रवेश अर्जात नमूद केलेल्या केंद्रावर ही पडताळणी करता येईल. 

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची पहिल्या टप्प्यातील कागदपत्र पडताळणी नुकतीच पूर्ण झाली. यामध्ये नीट परीक्षेतील ऑल इंडिया रॅंक १ लाख ७५ हजारांपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली. 

दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑल इंडिया रॅंक १७५००१ ते १२६९८९३ पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. मुंबई विभागीय केंद्राच्या विद्यार्थ्यांना जे. जे. हॉस्पिटल कॅम्पस, भायखळा आणि पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय, वरळी येथे पडताळणी करता येईल. पुणे केंद्राच्या विद्यार्थ्यांना बी. जे. मेडिकल महाविद्यालय, पुणे येथे पडताळणी करता येईल. 

Web Title: Medical course admission Second phase verification from July 14