वैद्यकीय अधिकाऱ्यांवर  सेवा समाप्तीची कारवाई 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 जानेवारी 2017

मुंबई - सरकारी सेवेत असतानाही कामावर रुजू न झालेल्या 581 वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. त्यापैकी 104 वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली असून, उर्वरित अधिकाऱ्यांची सेवा रद्द करण्याची शिफारस सामान्य प्रशासन विभागाकडे आणि आरोग्य परिषदेकडे करण्यात आली आहे. 

सरकारी सेवेतील 581 वैद्यकीय अधिकारी कामावर रुजू होत नसल्याने वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र, त्यांच्या जागा भरता येत नव्हत्या. अखेरीस गेली दहा पंधरा वर्षे सुरू असलेली कोंडी फोडण्यात आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना यश आले असून, फरार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागांवर भरती करण्यास सुरवात करण्यात आली आहे. काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा रुजू होण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे, त्यापैकी कोणी आले तर त्यांचे स्वागतच असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

Web Title: Medical service officials to take action