आंदोलनासंदर्भात आज भाजप आमदारांची बैठक 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मुंबई - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून, ते रोखण्याच्या उपाययोजनांसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी (ता. 2) आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापून आंदोलनाला राज्यभरात हिंसक वळण लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने आपल्या आमदारांची बैठक बोलावून मराठा आरक्षणाबाबत आपापली भूमिका निश्‍चित केली. मात्र भाजपकडून मराठा आरक्षणाबाबत आपल्या आमदारांचे म्हणणे जाणून घेण्यात आलेले नाही. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आरक्षण जाहीर करण्यास मुद्दाम चालढकल करत असल्याचा समज मराठा समाजात निर्माण झाला असून, त्यामुळे भाजप विरोधात संताप वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने तिला महत्त्व आले आहे. 

Web Title: Meeting of BJP MLAs today in connection with the agitation