शाळा अनुदानासाठी  आज मुंबईत बैठक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा किती द्यायचा, हे ठरविण्यासाठी उद्या (सोमवारी) मुंबईत बैठक होत आहे. 

सोलापूर -राज्यातील १६२८, तसेच १ व २ जुलै रोजी अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना सध्या शासनाने २० टक्के अनुदान सुरू केले आहे. या शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा किती द्यायचा, हे ठरविण्यासाठी उद्या (सोमवारी) मुंबईत बैठक होत आहे. 

शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला आमदार श्रीकांत देशपांडे, विक्रम काळे, दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, नागो गाणार, शिक्षण आयुक्त, प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण संचालक उपस्थित राहणार आहेत. शाळांना वाढीव टप्पा लागू करण्याबरोबरच अनुदानास पात्र घोषित केलेल्या उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देण्याबाबत, शासन स्तरावरील अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अनुदानास पात्र घोषित करणे या प्रमुख विषयांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting in Mumbai today for school funding