esakal | महाआघाडीच्या घटकपक्षांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर दबाव? सत्तापेच कायम
sakal

बोलून बातमी शोधा

member parties in Maha Aghadi Pressure on NCP and congress

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  काल (ता.17) पुण्यात होते. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांची भेट घेतली. तर, आरपीआय कवाडे गटाचे जोगेंद्र कवाडे यांनी कालच काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. या दोन्ही भेटीनंतर महाआघाडीच्या या घटक पक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर दबाव टाकला असल्याची चर्चा आहे. 

महाआघाडीच्या घटकपक्षांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर दबाव? सत्तापेच कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  काल (ता.17) पुण्यात होते. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांची भेट घेतली. तर, आरपीआय कवाडे गटाचे जोगेंद्र कवाडे यांनी कालच काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. या दोन्ही भेटीनंतर महाआघाडीच्या या घटक पक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर दबाव टाकला असल्याची चर्चा आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

त्यानंतर, आज (ता. 17) पहिल्यांदाच शरद पवार यांनी या घडामोडींमध्ये आघाडीच्या घटक पक्षांना विश्वासात घेण्याचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या पंधरा दिवसांत या मित्रपक्षांविषयी शरद पवार बोलले नव्हते. त्यानंतर राजू शेट्टी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या फोनोमध्ये किमान समान कार्यक्रमावर आम्ही आग्रही आहोत. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले होते.

मराठा आरक्षणासंदर्भात ज्येष्ठ विधीज्ञ मांडणार राज्य शासनाची बाजू

या गोष्टीचा संदर्भ लक्षात घेतल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर महाआघाडीतील घटक पक्षांकडून सत्ता स्थापन करण्याविषयी दबाब टाकला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ता पेच कायम असून कुठल्याही पक्षाला मिळून सत्ता स्थापन करण्यात अपयश आले आहे. त्यातच आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी शरद पवार यांच्या झालेल्या भेटीने सत्तापेच आणखीनच वाढवला आहे.