संजय राऊतांची सोशल मीडियावर धूम; मिम्सचा पाऊस!

टीम ईसकाळ
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

संजय राऊतांची चर्चा सोशल मीडियावर झाली नाही तर नवलंच! नेटकऱ्यांचे लक्षही राऊतांच्या भूमिकेकडे लागले असून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस होत आहे. 

सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ती फक्त संजय राऊतांची! भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युती पक्षांमध्ये मुख्यमंत्री आमचाच यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त चर्चा सुरू आहे ती शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची. 

शिवसेनेची हीच ती शेवटची वेळ !

Sanjay Raut

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून संजय राऊतांनी आपली भूमिका लावून धरली आहे. आज संजय राऊत काय बोलणार आहेत? याकडे सर्वांचं लक्ष्य लागून राहत आहे. त्यामुळे स्वपक्षीय, मित्रपक्ष आणि विरोधही धास्तावले आहेत. या एकूण प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर झाली नाही तर नवलचं! नेटकऱ्यांचे लक्ष्यही राऊतांच्या भूमिकेकडे लागले असून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस होत आहे. 

फडणवीस मावळते मुख्यमंत्री; शिवसेनेचा जहरी वार

sanjay raut

- महाराष्ट्राच्या कॅनव्हासवर शिवसेना रंग भरणार आणि त्याचा ब्रश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. 

- दिलेला शब्द पाळायचा ही बाळासाहेबांची शिकवण आहे. शिवसेनेने कोणतीही नरमाईची भूमिका घेतलेली नाही.

- भाजपने दिलेला शब्द पाळायला हवा, फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्यूलानुसारच मुख्यमंत्री पदाचंही समसमान वाटप व्हावं.

Image may contain: one or more people, horse and text

- 'विनाशकाले विपरित बुद्धी' ही आमची नाही, तर भाजपची अवस्था आहे. 

- महाराष्ट्राची कुंडली आम्हीच ठरवणार आहोत. 

शिवसेनेचे संख्याबळ 56 वरून 64 वर; "या'' आमदाराचाही पाठिंबा

- साहिब... मत पालिए, अहंकार को इतना, वक़्त के सागर में कई सिकन्दर डूब गए..!

sanjay raut

- सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवटीची भाषा करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. आधी ईडी व आता राष्ट्रपतींना या विषयात आणून ते धमकीची भाषा करत आहेत.

त्यानंतर संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही भेट घेतली. या भेटीत नक्की काय चर्चा झाली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

शिवसेनेची दमछाक करण्याची भाजपची रणनीती

मात्र, या सर्व घडामोडींमुळे ते दररोज चर्चेत राहिले. आता जो पर्यंत मुख्यमंत्री आणि जागा वाटप होत नाही, तोपर्यंत खासदार राऊत सतत चर्चेत राहतील. कारण त्यांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे.

Image may contain: 2 people


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Memes gets viral on Shivsena MP Sanjay Raut