अन् अजित पवार निघाले कमळाबाईचे Lover....

टीम ईसकाळ
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

सोशल मीडियावर या राजकीय परिस्थितीवर मिम्सचा धुमाकूळ सुरू आहे.

महाराष्ट्राच्या राजकरणात सध्या अनाकलनीय गोष्टी घडत आहेत. आज (ता. 23) सकाळी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतले. यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच सोशल मीडियावर या राजकीय परिस्थितीवर मिम्सचा धुमाकूळ सुरू आहे.

Image may contain: 1 person

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

कालपर्यंत महाविकासआघाडी म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी आघाडी होऊन सत्तास्थापनेची चर्चा सुरू होती. मात्र, काल एका रात्रीत सगळी सूत्रं फिरली व सकाळी फडणवीस व पवारांचा राजभवनात शपथविधी झाला. शरद पवारांनीही स्पष्ट केले की, अजित पवारांनी जो निर्णय घेतला त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही. त्यामुळे अजित पवार काही आमदारांना घेऊन बाहेर पडले का, अशीही चर्चा सुरू आहे. तर अजित पवारांनी आमदारांच्या सह्यांचा गैरवापर केला, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मल्लिक यांनी केली. 

Image may contain: text

पवार कुटुंबात उभी फूट; सुप्रिया सुळेंचे डोळे पाणावले

राजकीय परिस्थितीवरील मिम्स

Image may contain: text

Image may contain: text

धनंजय मुंडे काका-सोबत की पुतण्यासोबत....

Image may contain: text

Image may contain: text

स्थिर सरकारसाठी घेतला निर्णय : अजित पवार
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. शिवसेनेसोबत चर्चा संपतच नव्हती. त्यामध्ये नको त्या गोष्टीची मागणी वाढत चालली होती. राज्याला स्थिर सरकार मिळण्यासाठी यासाठी हा निर्णय मी घेतला. 

Image may contain: text

Image may contain: text

फडणवीस म्हणाले, की जनादेश आम्हाला महायुती म्हणून मिळाले होते. आम्ही एकमेकांना काय वचन दिले हे पाहण्यापेक्षा जनतेला दिलेले वचन महत्त्वाचे आहे. आमच्यासोबत येण्यापेक्षा दुसऱ्यासोबत जाणार असल्याने आम्हाला हा निर्णय घेतला. मी मोदी, अमित शहा यांचे आभार मानतो. 

संजय राऊत म्हणतात, आम्ही बिनधास्त आहोत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: memes viral on social media on Maharashtra Politics