मनोरुग्णाने घेतला चक्क रेल्वेच्या स्टेअरिंगचा ताबा! (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
मंगळवार, 25 जून 2019

- रेल्वेही चालवली संबंधित मनोरुग्णाने.

- रेल्वे स्थानकात पसरले भीतीचे वातावरण.

बीड : बीड जिल्ह्यातील परळी रेल्वे स्थानकात काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली. या रेल्वे स्थानकात एका मनोरुग्णाने चक्क रेल्वेचे स्टेअरिंग हातात घेत रेल्वे चालविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर रेल्वे स्थानकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

परळी स्थानकातून दुपारी एक वाजता अकोल्यासाठी रेल्वे सुटते. नेहमीप्रमाणे रेल्वे सुटण्याच्या तयारीत असताना एक मनोरूग्ण रेल्वे इंजिनच्या डब्यात येऊन बसला आणि त्याने या रेल्वेला सुरू देखील केलं. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, एक अनोळखी व्यक्ती रेल्वे इंजिनच्या डब्यात येऊन रेल्वे सुरू करते. मात्र, अशावेळी रेल्वे प्रशासन काय करते, असा सवाल संतप्त प्रवाशांकडून केला जात आहे. 

दरम्यान, मनोरुग्णाने रेल्वे चालविण्याचा प्रकार वेळीच लक्षात आल्याने सुदैवाने पुढील दुर्घटना टळली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mentally Challenged Man Takes Control of Railway