पुढील चार दिवसात राज्यात थंडी वाढणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात मागील दोन तीन दिवस उन्हाचे चटके अनुभवता आले. मात्र, पुढील चार दिवसांमध्ये राज्यातील थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता वेधशाळेनी वर्तवली आहे. 

पुणे : राज्यातील काही भागांमध्ये हिवाळ्याची सुरूवात झाल्याचे दिसून आले. तसेच वेधशाळेच्या माहितीनूसार गेल्या 24 तासांमध्ये कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर, राज्यात सर्वाधिक कमी तापमान अहमदनगर येथे 13 अंश सेल्सिअस नोंदवले गेले व गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. 

चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात मागील दोन तीन दिवस उन्हाचे चटके अनुभवता आले. मात्र, पुढील चार दिवसांमध्ये राज्यातील थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता वेधशाळेनी वर्तवली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mercury will drop in the state over the next four days