#MeToo चे वारे आता मराठीतही!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

पुणे - कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणारी #MeToo ही चळवळ आता आणखी व्यापक होत आहे. इंग्रजी माध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिलांनी याबाबत सोशल मीडियावर बोलायला सुरवात केली होती. आता मराठी साहित्यिक, लैंगिक अल्पसंख्यही आपल्या अशा अनुभवांबाबत  व्यक्त होत आहेत. 

लैंगिक अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या व मराठीतील पहिल्या तृतीयपंथीय कवयित्री दिशा शेख यांनी आपले दाहक अनुभव फेसबुकवर लिहिले आहेत. काही वर्षांपूर्वी शेख जेव्हा एसटीडी बूथवर नोकरी करत होत्या, त्या वेळी तेथील सहकाऱ्याने केलेल्या लैंगिक शोषणाबद्दल त्यांनी लिहिले आहे. तृतीयपंथीयांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आधीच पूर्वग्रहदूषित असल्याने व्यवस्थेच्या प्रत्येक पायरीवर त्यांचे महिलांपेक्षाही जास्त शोषण केले जाते, त्यामुळे या मोहिमेच्या निमित्ताने आमच्या लैंगिक शोषणाबाबतही मोकळेपणाने बोलले पाहिजे, तर यावर जनजागृती होऊन हे प्रकार रोखता येतील, असे शेख यांनी सांगितले. 

‘ब्लॅक रोझ इंडिया’ या फेसबुक पेजवरही अनेक समलिंगी व्यक्तींनी त्यांचे कटू अनुभव लिहिले आहेत. साहित्यिक प्रा. प्रज्ञा दया पवार यांनी त्यांच्यासोबत एका दिवंगत मराठी कवीने केलेल्या गैरवर्तणूक, छळवणुकीविरोधात पहिल्यांदाच लिहिले आहे.

Web Title: #MeToo in marathi