#MeToo दिग्दर्शकांच्या संघटनेतून साजिद खान निलंबित

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मुंबई - देशातील "# MeToo' च्या वादळात अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडे बोटे वळविण्यात आली. या प्रकरणातील गंभीर आरोपांमुळे प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानला भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी दिग्दर्शक संघटनेने एका वर्षासाठी निलंबित केले आहे.

साजिद खानवर तीन महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. अभिनेत्री रेचेल व्हाईट, सहायक दिग्दर्शिका सलोनी चोप्रा आणि पत्रकार करिश्‍मा उपाध्याय यांनी साजिद खानवर केलेले शोषणाचे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी दिग्दर्शक संघटनेने साजिद खानला एका वर्षासाठी निलंबित केले आहे. संघटनेच्या समितीने साजिदवरील आरोपांची शाहनिशा केली. त्यामध्ये हे आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याने त्याला या संघटनेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. साजिदनेही त्याला त्यांच्या बचावासाठी बोलण्याची संधी दिली तेव्हा त्याने काहीही बोलण्यास नकार दिला आणि महिलांचा अनादर करायचो असे स्पष्टपणे सांगितले. आरोपांनंतर तो "हाऊसफुल 4' या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या खुर्चीतून पायउतार झाल्याचे समोर आले. तसेच अक्षय कुमार, फरहान अख्तर यांनीही साजिदची बाजू घेतली नाही.

Web Title: MeToo Sajid Khan Suspend in Director Organisation