गरीबांच्या घरांचे स्वप्न साकारणार

तात्या लांडगे
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

सोलापूर : मुंबई, पुणे, नाशिक, सांगलीसह अन्य महत्त्वाच्या शहरात परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबईनंतर आता पुणे, सांगली, कोल्हापूरसह पिंपरी, चाकण येथील घरांची घोषणा लवकरच केली जाणार आहे. 

सोलापूर : मुंबई, पुणे, नाशिक, सांगलीसह अन्य महत्त्वाच्या शहरात परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबईनंतर आता पुणे, सांगली, कोल्हापूरसह पिंपरी, चाकण येथील घरांची घोषणा लवकरच केली जाणार आहे. 

मुंबईतील म्हाडाच्या घरांची घोषणा दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आली. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सोमवार, 5 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. त्याची घोषणा 16 डिसेंबर रोजी होणार आहे. म्हाडाच्या अत्यल्प प्रवर्गासाठी मुंबईत घराची किंमत 20 लाखांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. तसेच अल्प उत्पन्न गटासाठी 20 ते 35 लाख तर मध्यम उत्पन्न असणाऱ्यांसाठी 35 ते 60 लाख रुपयांची किंमत म्हाडाने ठरविली आहे. म्हाडाचे सर्वात कमी किंमतीचे घर 14 लाख 62 हजार रुपयांना मिळणार असून उच्च उत्पन्न गटातील धवलगिरी कंबाला हिल येथील घरांची किंमत सर्वाधिक पाच कोटी 80 लाख रुपये असेल, असे म्हाडातर्फे सांगण्यात आले. 

मुंबईनंतर आता पुण्यातील 28 ठिकाणांवरील म्हाडाच्या घरांची घोषणा 15 नोव्हेंबरपर्यंत केली जाणार असून त्याचवेळी सांगलीतील घरांसाठीही ऑनलाईन अर्ज मागविले जातील. त्याठिकाणी अल्प (सहा लाख) आणि अत्यल्प (तीन लाख) उत्पन्न असणाऱ्यांना 12 ते 20 लाखांपर्यंत घरे मिळणार आहेत. सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमधील घरांची कामे जूनपर्यंत पूर्ण होतील. 
- अशोक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा 

म्हाडाच्या घरांची स्थिती 
मुंबई 
1384 
पुणे 
750 
सांगली 
88 
महाळूंगा (चाकण) 
2000 
सोलापूर 
96 
कोल्हापूर 
67

Web Title: mhada to build houses in Pune, Sangli, kolhapur, Pimpri, Chakan

टॅग्स