म्हाडाच्या परीक्षेतील घोटाळा उघड; सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

"परीक्षांचा निकाल असाच लावणार की मुख्य परीक्षा घेणार", एमपीएससी समन्वय समितीचा सरकारला सवाल
Mhada Exam
Mhada ExamSakal Digital

मुंबई : राज्यात महिनाभरापूर्वी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या (Mhada Exam) पेपरदरम्यान घोटाळा झाल्याची चर्चा होती, हा घोटाला आता उघड झाला आहे. औरंगाबादमधील एका परीक्षा केंद्रावरील घोटाळ्याचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. (MHADA exam scam exposed CCTV footage came in front)

समोर आलेल्या फुटेजनुसार, परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षा केंद्राचा मालक, सुपरवाझर आणि काही उमेदवार केंद्रामध्ये शिरले. त्यांनी ऑनलाईन परीक्षा होणाऱ्या कॉम्प्युटर्सची छेडछाड केल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे. परीक्षेच्या आधी केंद्र एजन्सीच्या ताब्यात असतं तरीही औरंगाबादच्या 'मौर्य इन्फोटेक' या परीक्षा केंद्रावर हे घोटाळेबाज कसे घुसले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परीक्षा केंद्रात घुसलेल्या या लोकांनीच पेपरही लीक केल्याचा आरोप केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या केंद्रावर सुपरवाझर उमेदवाराच्या शेजारी बसून त्याला परीक्षेची उत्तरं सांगताना दिसतो आहे. त्यामुळं आता अशा पद्धतीनं झालेल्या म्हाडाच्या परीक्षांचा निकाल असाच लावणार की मुख्य परीक्षा घेणार? असा सवाल एमपीएससी समन्वय समितीनं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना केला आहे.

Mhada Exam
धक्कादायक! पुण्यात झाडाला लटकवलेल्या अवस्थेत आढळला मुलीचा मृतदेह

दरम्यान, म्हाडाची परीक्षा व्हायच्या एक दिवस आधी इथल्या पेपरफुटीची माहिती मिळाल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा अचानक रद्द केल्याची घोषणा केली होती. ऐनवेळी पेपर रद्द झाल्यानं उमेदवारांना थोडासा त्रास सहन करावा लागेल पण यापुढे जी परीक्षा होईल ती फुलप्रुफ असेल असा दावाही करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com