महाराष्ट्र काँग्रेसमध्ये 'भूकंप'; मिलिंद देवरा यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
रविवार, 7 जुलै 2019

- राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षातील नेतेमंडळींकडूनही राजीनामासत्र सुरु.

- दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता.

मुंबई : राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षातील नेतेमंडळींकडूनही राजीनामासत्र सुरु झाले आहे. आता काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा यांच्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांना लोकसभा निवडणुकीत अपयश आले होते. त्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या पदाचा राजीनामा सोपवताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यीय पॅनेलचा प्रस्तावही मांडला आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीचा सामना करणे, हे काँग्रेससाठी मोठे आव्हान आहे, असे देवरा यांनी राजीनामा देताना सांगितले. 

दरम्यान, मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांना दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milind Deora resigns as Mumbai Congress president