आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात; काय आहे कारण? Maharashtra Budget Session | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget Session

Maharashtra Budget Session : आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात; काय आहे कारण?

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यानआमदार नसतानाही ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर सभागृहात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. (Milind Narvekar who is not mla attends the Maharashtra Budget Session)

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपालांच्या अभिभाषणासाठी मिलिंद नार्वेकर सभागृहात येऊन बसले. सुरक्षारक्षकांनी आत कसे काय सोडले ? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर नार्वेकर उठून बाहेर गेले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही त्यांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांसी बोलताना नार्वेकरांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. 'मिलिंद नार्वेकर यांची अनेक वर्षांपासून आमदार होण्याची इच्छा आहे. कदाचित त्यांना सर्वांसोबत संपर्क साधायचा असेल.

मिलिंद नार्वेकर यांची अनेक वर्षांपासून इच्छा आहे की मी आमदार व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना आमदार बनवले नाही यात आमचा दोष नाही. मिलिंद नार्वेकर सगळ्यांच्या मधले दुवा आहेत. मिलिंद नार्वेकर लवकर आमच्याकडे येऊ शकतात. त्यांना आमदार होणार असे वाटते. मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात आहेत.' असं शिरसाट म्हणाले

टॅग्स :milind narvekar