एमआयएम आमदाराची मराठा आरक्षणाविरोधात याचिका

Maratha Reservation
Maratha Reservation

मुंबई : सरकार समाजामध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले असून, या आरक्षणाविरोधात यापूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत. या याचिकांवर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही. आता नव्याने एमआयएमच्या आमदारांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी करत मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे.

पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील म्हणाले, की मराठा समाजाला देण्यात आलेल्या 16 टक्के आरक्षणाला स्थिगिती द्या. मराठा आरक्षणाचा एसईबीसी कायदा रद्द करा. समाजात भांडणे लावण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. महाराष्ट्रातील यापूर्वीच्या सरकारने बनविलेल्या समितीने सांगितलेले आहे, की मुस्लिमांना मागासवर्गीय ठरविले जावे. आतापर्यंत बनविलेल्या चारही समितीच्या अहवालामध्ये मुस्लिमांना शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास ठरविण्यात आलेले आहे. मराठा आरक्षण द्यावे असे मुस्लिमांचे म्हणणे आहे. पण, मुस्लिमांनाही 5 टक्के आरक्षण देण्यात यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com