एमआयएम आमदार मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे घेणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे घेणार आहेत. सरकार समाजामध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप करत इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मुंबई : एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे घेणार आहेत. सरकार समाजामध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप करत इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते, या आरक्षणाविरोधात जलील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता त्यांनी ही याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मुस्लिम समाजाला आरक्षणाची मागणी करत मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.

मराठा समाजाला देण्यात आलेल्या 16 टक्के आरक्षणाला स्थिगिती द्या. मराठा आरक्षणाचा एसईबीसी कायदा रद्द करा. समाजात भांडणे लावण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. मराठा आरक्षण द्यावे असे मुस्लिमांचे म्हणणे आहे. पण, मुस्लिमांनाही 5 टक्के आरक्षण देण्यात यावे, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या.

Web Title: MIM MLA will withdraw the petition against Maratha reservation