दुधासाठीही आता किमान आधारभूत दर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

मुंबई - दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर देण्यासाठी किमान आधारभूत दराचा (एसएमपी) कायदा आणण्याचा सरकार विचार करत आहे. 

मुंबई - दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर देण्यासाठी किमान आधारभूत दराचा (एसएमपी) कायदा आणण्याचा सरकार विचार करत आहे. 

ऊस पिकाप्रमाणेच ७०:३० टक्‍क्‍यांच्या गुणोत्तराचा अवलंब करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी तत्काळ केली जाईल, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी बुधवारी दिली. दुधाचा उत्पादन खर्च निश्‍चित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ, तसेच दूध उत्पादकांचे प्रतिनिधी घेण्यात येतील. सर्वांकडून सूचना मागविण्यात येऊन दुधाचा किमान उत्पादन खर्च निश्‍चित करण्यात येईल. त्यानुसार शेतकऱ्यांना दर मिळावा यासाठी सरकार उपाययोजना करेल, असे आश्‍वासन त्यांनी बोलताना दिले.

जानकर म्हणाले...
सहकारी व खासगी दूध संघांनीही सरकारी दर देण्यासाठी उपाय 
सरकारी दर न दिलेल्या सहकारी संघांवर कारवाई
काही संघांकडून फरकाची वसुली
फरक दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश 
दुधाळ जनावरांचे वाटप आता सर्वसाधारण घटकातील लाभधारकांनाही

Web Title: Minimum support rates for milk