पुण्यात थंडीत चढ-उतार; नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वांत नीचांक तापमान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

रविवारी ते किंचित वाढल्याने थंडी दोन दिवसांच्या तुलनेत कमी होती. शिवाजीनगर येथील वेधशाळेत रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात 14.6 अंश सेल्सिअस आणि लोहगाव येथे 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. 

पुणे - पुण्यात दोन दिवसांपासून किमान तापमान घसरत होते. मात्र रविवारी ते किंचित वाढल्याने थंडी दोन दिवसांच्या तुलनेत कमी होती. शिवाजीनगर येथील वेधशाळेत रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात 14.6 अंश सेल्सिअस आणि लोहगाव येथे 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. 

शहरात शनिवार (ता. 7) आताच्या हिवाळ्यातील सर्वांत नीचांक तापमान नोंदविण्यात आल्यामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यातील सर्वाधिक कमी किमान तापमान असलेले हे यंदाचे दुसरे वर्ष ठरले. दरम्यान, पुढील सहा दिवसांमध्ये शहर आणि परिसरात किमान तापमानात काहीसा चढ-उतार होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विदर्भात थंडीचा जोर वाढला 
रविवारी राज्यात मध्य महाराष्ट्र व कोकण गोव्यातील काही भागांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र विदर्भात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात उल्लेखनीय घट झाल्याचे रविवारी हवामान विभागामार्फत नोंदविण्यात आले. राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद चंद्रपूर येथे 10 अंश सेल्सिअस आणि सर्वाधिक कमाल तापमान सांताक्रूझ 35.8 अंश सेल्सिअस येथे झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारी विदर्भातील प्रमुख शहरातील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा सुमारे 3 ते 5 अंश सेल्सिअसने घसरले. त्यामुळे विदर्भातील थंडीचा कडाका वाढला आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा 1.6 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minimum temperature in Pune had been dropping for two days