...अन्‌ विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा सुरु असताना आदित्य ठाकरे आले बाहेर 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहपत्नीक येथे श्री विठ्ठल रुक्मीणीची बुधवारी पहाटे महापुजा केली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे उपस्थितीत होते. मात्र, महापूजा सुरू असताना अचानक आदित्य ठाकरे यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते मंदिरातून बाहेर पडले.

पंढरपूर (सोलापूर) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहपत्नीक येथे श्री विठ्ठल रुक्मीणीची बुधवारी पहाटे महापुजा केली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे उपस्थितीत होते. मात्र, महापूजा सुरू असताना अचानक आदित्य ठाकरे यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते मंदिरातून बाहेर पडले.
आषाढी एकादशीनिमित्त प्रथेप्रमाणे पंढरपुरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्या ठाकरे यांच्या हस्ते महापूजा झाली. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे पंढरपूरात वारकऱ्यांना येण्यास मनाई करण्यात आली होती. मुख्यमंत्री ठाकरे सहपत्नीक मंगळवारी रात्री पंढरपुरात दाखल झाले होते. विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशीनिमित्त महापूजेसाठी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल बढे व अनुसया बढे या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थितीत होते. पण काही वेळानंतर अचानक आदित्य यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे पूजा अर्धवट सोडून आदित्य ठाकरे मंदिरातून बाहेर पडले. आदित्य ठाकरे मंदिरातून बाहेर आल्यामुळे सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली. आदित्य ठाकरे गाडीजवळ पोहोचले. अस्वस्थ वाटत असल्यामुळे आदित्य यांनी गाडीत पाणी घेतले. त्यानंतर बरं वाटू लागल्यामुळे आदित्य पुन्हा मंदिरात दाखल झाले आणि पुन्हा महापूजेत सहभागी झाले. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी भाविकांना केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Aditya Thackeray walked out of the temple while the Mahapuja of Vitthal Rukmini was starting