टिकेची झोड उठताच आठवले यांना उपरती

Ramdas Athwale
Ramdas Athwale

मुंबई : "इंधन दरवाढीचा मला त्रास नाही...मी मंत्री असल्याने पेट्रोल फुकट मिळते" असे वक्तव्य करुण टिकेची झोड़ ओढवून घेणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना चोवीस तासानन्तर उपरती आली आहे. सर्व सामान्य जनतेच्या भावना दुखावन्याचा माझा हेतू नव्हता, ऐसे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

पेट्रोल डिझेल ची दरवाढ रद्द झाली पाहिजे.वाढते इंधन दर रोखले पाहिजेत ही सामान्य जनतेची भावना योग्य असून इंधन दरवाढ कमी करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. इंधन दरवाढ आणि सर्व प्रश्नांवर आपण नेहमी जनतेच्या भावना समजून घेतल्या आहेत त्यामुळे इंधन दरवाढ बद्दल बोलताना आपला कुणाच्याही भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता. आपण नेहमी जनभावनेप्रति संवेदनशील आहोत त्यामुळे माझ्या वक्तव्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असा खुलासा आठवले यांनी मुंबईत केला. 

इंधन दरवाढीचा रिपब्लिकन पक्षाने विरोध केला आहे. इंधन दरवाढी मुळे सामान्य जनतेला महागाई चा सामना करावा लागतो. सामान्य जनतेच्या व्यथा आपल्याला चांगली माहीत असून जनभावनेचा आपण नेहमीच आदर राखला आहे.आपण सामान्य जनतेतूनच अडचणींचा सामना करूनच पुढे आलो आहोत त्यामुळे सामान्य जनतेचे नेमके प्रश्न आपल्याला चांगले माहीत आहेत आणि आपण त्या खस्ता खाल्ल्या आहेत. त्या व्यथा अनुभवल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या भावनांबद्दल आपण कधीही असंवेदनशील राहू शकत नाही. जनतेच्या भावना दुखाविणारे मत आपण कधीही मांडले नाही. इंधन दरवाढबाबत विचारण्यात आलेला प्रश्न हा माझ्या व्यक्तिगत स्तरावर विचारला होता मात्र  इंधन दरवाढीबाबत जनतेला होत  असलेल्या त्रासाबद्दल  जेथे जेथे थेट विचारले जाते तेथे  माझे उत्तर हे इंधन दरवाढ रद्द करावे असेच असते तसेच सामान्य जनतेची जी मागणी असते तीच मागणी माझा रिपब्लिकन पक्ष करीत आला असून आपण ही सदैव सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आलेलो आहोत असे स्पष्टीकरण ना रामदास आठवले यांनी आज केले. 

इंधन दरवाढ हा गंभीर विषय आहे. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना इंधन दरवाढ कमी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाने हे इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. इंधन दरवाढ प्रश्नांवर मी केलेले वक्तव्य कुणाच्या भावना दुखविणारे ठरले असल्यास त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे रामदास आठवले यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com