सुभाष देशमुख यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Subhash  Deshmukh
Subhash Deshmukh

नागपूर : कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर विरोधकांनी केलेल्या आरोपांना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जोरदार हल्लाबोल केला. सहकारी साखर कारखाने व जिल्हा सहकारी बॅंका यांच्यातल्या संगनमताने हजारो कोटी रूपयांची कर्जे साखर कारखान्यांना वाटप करण्यात आली. ती कर्जे कारखान्यांनी बुडवली. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज वाटपात अडचणी आल्याचा प्रतिहल्ला चढवला. 

यावेळी उत्तर देताना सहकार मंत्र्यांनी विरोधकांवर शरसंघान साधले. ते म्हणाले की तुमच्या काळात कुणी साखर कारखाने काढू नयेत अशी धूर्त भूमिका होती. पण, अटलबिहारी वाजपेयी यांनी 15 किलोमीटरची अट काढली म्हणून मी कारखाना काढू शकलो. 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झोनबंदी लागू करून तुम्ही शेतकऱ्यांना लाचारी पत्करायला लावली. गोपीनाथ मुंडेंनी ही झोनबंदी उठवली आणि शेतकरी कुठेही ऊस घालू लागला. यावर सेबीने सुभाष देशमुख यांच्या कारखान्याला नोटीस काढल्याचा दाखला विरोधी पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिला. 

त्यावर देशमुख यांनी सेबीच्या निर्देशानुसार एकाही शेतकर्‍याची मी दमडी बुडणार नाही. असा खुलासा केला. दरम्यान राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकांवर सहकारमंत्र्सानी जोरदार हल्ला चढवला. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्याची थकीत कर्ज त्यांनी जाहीर केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com