सहकारमंत्र्यांच्या कारखान्यांची बाजी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

सोलापूर - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समूहाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या कारखान्यांनी आज अडीच हजार रुपयांची पहिली उचल जाहीर केली. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत दिलेली ही सर्वाधिक पहिली उचल ठरली आहे. आतापर्यंत उचल देण्यामध्ये सहकारमंत्र्यांच्या कारखान्यांनी बाजी मारल्याचे दिसून येते. 

बीबी दारफळ (ता. उत्तर सोलापूर) व भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) या ठिकाणी "लोकमंगल'चे साखर कारखाने आहेत. बीबी दारफळ येथे शनिवारी (ता. 5) मोळी टाकण्याचा कार्यक्रम झाला. त्या वेळी कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी यंदाच्या गाळप हंगामासाठी दोन हजार 200 रुपयांची पहिली उचल देण्याचे जाहीर केले होते. आज कारखान्याच्या वतीने अडीच हजार रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर करून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला.

Web Title: Minister Subhash Deshmukh Lokmangal industry factories win