राज्यातील मंत्री-आमदार कोटींचे थकबाकीदार, भाजपचे जयकुमार गोरे अव्वल

 light bill
light billSakal

ज्यात लोडशेडिंगवरून जनता त्रस्त असताना आता राज्यातील मंत्री, आमदार, खासदारांनी लाखो रुपयांची बिलं थकवल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या यादीत सुरुवातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील नाव होते. मात्र ऊर्जा विभागाकडून थकित वीजबिलांची नवी यादी जाहीर करण्यात आली.

या नव्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन तासात ऊर्जा विभागाकडून नवी यादी जाहीर झाली. त्यात अजित पवारांचं नाव वगळ्यात आलं आहे. 30 एप्रिल 2022 पर्यंत राज्यातील अतिमहत्वाच्या आमदार-खासदार आणि मंत्री असे 372 ग्राहकांची एक कोटी 27 लाखांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

 light bill
महाराष्ट्र अंधारात! महावितरणकडून भारनियमचं वेळापत्रक जाहीर

कोणी किती बिल थकवलं?

आरोग्यमंत्री राजेश टोपे याची 4 लाख रुपये थकबाकी

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात 10 हजार रुपये थकबाकी

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 2 लाख 63 हजार रुपये थकबाकी

राज्यमंत्री विश्वजित कदम यांची 20 हजार रुपयांची वीज बिल थकीत आहे

युवराज संभाजीराजे 1 लाख 25 हजार 934

माजी मंत्री सुभाष देशमुख यांची तीन वीज कनेक्शन आहेत. एकूण मिळून 60 हजार रुपये थकबाकी आहे.

भाजप आमदार जयकुमार गोरे 7 लाख रुपये थकबाकी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 2 लाख 25 हजार थकीत

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे 70 हजार रूपये थकबाकी

आमदार समाधान आवताडे एकूण 20,000 थकबाकी

आमदार राजेंद्र राऊत बार्शी 3 लाख 53 हजार रूपये थकबाकी

आमदार बबनराव शिंदे व त्यांचे आमदार बंधू संजय शिंदे आणि कुटुंबियांची तब्बल 22 वीज जोडणीतील तब्बल 7 लाख 86 हजार रुपये थकीत

खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची चार वीज जोडणीतील 3 लाख रुपये

आमदार संग्राम थोपटे यांची चार विज जोडणीतील 1 लाख रुपये थकीत

माजी खासदार प्रतापराव जाधव दिड लाख रुपये थकीत

शिवसेना आमदार सुहास कांदे 50 हजार रुपये थकीत

आमदार रवी राणा 40 हजार रुपये थकीत

आमदार वैभव नाईक यांच्या औद्योगिक वीज जोडणीची 2 लाख 80 हजार थकबाकी

माजी मंत्री विजयकुमार गावित 42 हजार थकबाकी

माजी आमदार शिरीष चौधरी 70 हजार थकबाकी

मंत्री संदीपान भुमरे 1 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी

खासदार रजनीताई पाटील यांची 3 लाख रुपये थकबाकी

आमदार प्रकाश सोळंके 80 हजार रुपये थकबाकी

आमदार संदीप क्षीरसागर 2 लाख 30 हजार रुपयांची थकबाकी

राज्यमंत्री संजय बनसोडे 50 हजार रुपयांची थकबाकी

आमदार अशिष जयस्वाल 3 लाख 36 हजार रुपये थकीत

आमदार महेश शिंदे 70 हजार रुपये

माजी मंत्री सुरेश खाडे यांचे कुटुंबीय याची 1 लाख 32 हजार थकबाकी

सुमन सदाशिव खोत 1 लाख 32 हजार 435

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com