राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सोलापूरची मिणियार, जालन्याची खांडेभराड पहिले 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

गट पहिला मिनीयार आदिती (सोलापुर, प्रथम), रोकडे कृष्णा (पुणे, द्वितीय), जोशी अवधुत (परभणी, तृतीय), गट दुसरा पूर्वा खांडेभराड (जालना, प्रथम), उन्नती खोकले (यवतमाळ-द्वितीय), किमया बुरांडे (बार्शी, तृतीय), गट तिसरा सुहास थ्वंटे (सोलापुर, प्रथम), श्रीकांत मोगरे (परभणी, द्वितीय), श्रुती दराडे (नागपूर, तृतीय). स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना जालना येथील कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची तारीख नंतर कळविण्यात येईल असे संघटनेच्या परिपत्रकात म्हटले आहे. 

सोलापूर ः छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सोलापूरची आदिती मिणियार तर जालन्याची पूर्वा खांडेभराड यांनी पहिला क्रमांक मिळविला. तीन गटांमध्ये ही स्पर्धा झाली. 

या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. ही स्पर्धा पहिली ते तिसरी (गट पहिला), चौथी ते सहावी (गट दुसरा), सातवी ते नववी (गट तिसरा) अशा तीन गटात झाली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय चित्रकार नितीन खिलारे यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी राज्यभरातुन 850 विद्यार्थी सहभागी झाले होते. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील-भोयर यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जाहीर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल, प्रदेश सचीव सुनिल चव्हाण, अंबादास रेडे, राजकिरण चव्हाण, विनोद आगलावे, अनिल गायकवाड, दिपक डांगे, अतुल नारकर यांनी प्रयत्न केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miniyar of Solapur and Khandebharad of Jalna won the state level painting competition