Video : अबब आश्चर्य... हातपंपाला न हापसताच येतंय पाणी

संतोष सिरसट
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

मोहोळ तालुक्यातील मलकाची हिंगणी या ठिकाणी मलिक बाबांचा प्रसिद्ध दर्गा आहे. त्या दर्ग्याच्या समोर एक हातपंप आहे. त्या हातपंपला न  हापसताही पाणी येत आहे. 

साेलापूर : मोहोळ तालुक्यातील मलकाची हिंगणी या ठिकाणी मलिक बाबांचा प्रसिद्ध दर्गा आहे. त्या दर्ग्याच्या समोर एक हातपंप आहे. त्या हातपंपला न  हापसताही पाणी येत आहे. 

मोहोळ तालुक्यातील या परिसरात यंदा चांगला पाऊस झाल्याने भूजल पातळी उंचावली असल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल. सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी जेमतेम 38 टक्के पाऊस झाला होता. मात्र यंदाच्या वर्षी पावसाने बळीराजाला दिलासा दिला आहे. पावसाळ्यातील चार महिन्यांमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा सुद्धा कमी पाऊस होता, मात्र ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी, नाले, तळी दुधडी भरून वाहत आहे.

काही गावांचा अपवाद वगळता सगळीकडे पाणीपातळी वाढली  आहे. त्याचाच परिणाम म्हणून हिंगणे येथील मलिक बाबा दर्गाच्या समोर असलेल्या हातपंपाला न हापसताही पाणी येत आहे. देवाची करणी आणि नारळात पाणी या उक्तीप्रमाणे या हात पंपाला पाणी येत असल्याने विशेष मानले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miracle Tap in Solapur is getting water without turning it on