सरकारकडून सत्तेचा गैरवापर - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

माढा - सध्याचे भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (ता. २१) माढा तालुक्‍यातील निमगाव (टें.) येथे पत्रकारांशी बोलताना केला. 

पवार म्हणाले, ‘‘नाशिक येथील शेतकऱ्यांच्या मोर्चाला अडवले जात आहे. मोर्चा गुंडाळायला सांगितले जात आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय केला तर चांगला आहे. पण, विधानसभेत ठराव करायचा अन्‌ केंद्रात पाठवायचा. धनगर समाजाला केंद्र व राज्य सरकारच्या वतीने आदिवासी असल्याचे प्रत्यक्ष प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत या गोष्टीला अर्थ नाही.’’

पवार म्हणाले, ‘‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा जागावाटपाबाबत प्रश्‍न संपला असून, डॉ. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर मित्रपक्षांबरोबर चर्चा सुरू आहेत.’’

पुलवामा हल्ल्यानंतर सर्व पक्ष सरकारच्याबरोबर आहेत. परंतु सर्जिकल स्ट्राइक व जवानांच्या योगदानाचा राजकीय फायदा घेण्याचा भाजप सरकारने प्रयत्न केला आहे.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Misuse of power by the government Sharad Pawar