Vidhan Sabha 2019 : शिवसेनेच्या विद्यमान आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

MLA Amit Ghoda enters in NCP presence of Ajit pawar
MLA Amit Ghoda enters in NCP presence of Ajit pawar

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या इनकमिंग सुरू झाले असून आज पालघरचे शिवसेना आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. अमित घोडा हे पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असू अनुसुचित जमाती कल्याण समितीचे सदस्य ही आहेत. त्यांनी फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांचा पराभव केला होता. 

दरम्यान, शिवसेनेकडून माजी मंत्री राजेंद्र गावित यांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या आमदार अमित घोडा यांनी आज (ता.03) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com