
Maharashtra Politics : विरोधकांची डोकेदुखी वाढणार; अधिवेशनाआधी १० आमदार फुटणार?
राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच राजकीय नेत्यांचे इतर पक्षात होणाऱ्या प्रवेशाची संख्याही वाढली आहे. तर आगामी अधिवेशनाआधी विरोधी पक्षांचे 10 ते 12 आमदार फुटणार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. इतर पक्षातल्या 10 ते 12 आमदारांचा भाजप आणि शिंदे गटात प्रवेश होऊ शकतो असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.
बच्चू कडू म्हणाले की, इतर पक्षातले काही आमदार आहेत. त्यांचाही पक्षप्रवेश कदाचित होऊ शकतो. तारखेवर तारीख येत आहे. त्याचं कारण एक तर कोर्ट आणि दुसरं कारण पक्षप्रवेश 10 ते 15 आमदार फुटतील, असा दावा त्यांनी केला आहे.
तर बच्चू कडू यांनी कुठल्या पक्षाचे आमदार फुटणार आहेत ते मात्र गुपीत ठेवलं आहे. आत्ताच याबाबत गौप्यस्फोट करु इच्छित नसल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत. कुठल्या पक्षातले फुटतील ते मला स्पष्ट सांगता येणार नाही. हे गोपनीय आहे. तुम्हाला मोघमपणे सांगू शकतो. हेच फुटणार, याच पक्षाचे फुटणार हे नाही सांगू शकत. पण मला वाटतं 10 ते 15 आमदार अधिवेशनाआधी फुटणार आहेत, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
तर बच्चू कडू यांच्या या दाव्याला शिंदे गटाचे मंत्री शहाजीबापू पाटील यांनी दुजोरा दिला आहे. तर म्हणाले की, आमदार बच्चू कडू हे जबाबदारीनं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते जे म्हणालेत काँग्रेसचे 25 आमदार फुटीच्या मार्गावर आहेत तर फुटू शकतात.