Bacchu Kadu: …म्हणून घेणार फडणवीस यांची भेट, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीवर कडू यांची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bacchu Kadu

Bacchu Kadu: …म्हणून घेणार फडणवीस यांची भेट, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीवर कडू यांची प्रतिक्रिया

आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्यातलं राजकारण चांगलचं तापलं. आरोपानंतर बच्चू कडू जास्तच आक्रमक झाले होते. रवी राणा यांनी 50 खोके घेतले याचे पुरावे द्यावे अन्यथा वेगळा मानहाणीचा दावा करू असे कडू म्हणाले होते. आपल्याला सात ते आठ आमदारांचा पाठिंबा आहे असंही बच्चू कडू यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटलं असं वाटत असतानाच पुन्हा एकदा रवी राणा यांच्या एका व्यक्तव्यामुळे वाद वाढण्याची चिन्हं दिसून येत आहेत.

हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

मात्र रवी राणा यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी सौम्य भूमिका घेतल्याचंही पहायला मिळत आहे. बच्चू कडू आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. ते भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: Bacchu Kadu: ''सत्ता गेली चुलीत; आमच्या वाटेला आले तर कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही''

दरम्यान रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे बच्चू कडू नाराज असून, राणांच्या वक्तव्यानंतर कडू फडणवीसांकडे नाराजी व्यक्त करण्यासाठी ते फडणवीस यांची भेट घेणार आहेत अशी चर्चा होती. मात्र बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया देताना सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे. राणांचं वक्तव्य साधारण आहे, मला वाद वाढवायचा नाही. मतदारसंघाला निधी दिल्यामुळे आभार माणण्यासाठी फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.