आमदार गिरीश महाजनांची प्रविण चव्हाणांविरोधात तक्रार

आता हे प्रकरण पुन्हा कोणतं नवं वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
girish mahajan
girish mahajanesakal
Summary

आता हे प्रकरण पुन्हा कोणतं नवं वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अधिवेशनात अनेक मुद्दे समोर येत आहेत. यावरुन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप पहाय मिळाले आहेत. आता आणखी एक वेगळी बातमी समोर येत आहे. भाजपाचे आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्थानकात या तक्रारीची नोंद झाली आहे.

प्रवीण चव्हाण यांनी गिरीश महाजन खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं होतं असा गौफ्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केला होता. त्यांनी पुराव्यादाखल पेनड्राईव्हही सादर केला होता. त्यामुळे प्रवीण चव्हाण (Pravin Cahavan) यांच्याविरोधात गिरीश महाजन यांनी तक्रार दाखल केली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस स्थानकात या तक्रारीची नोंद झाली आहे. आता हे प्रकरण पुन्हा कोणतं नवं वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

girish mahajan
'आव्हाड भावूक नेते, त्यांच्या मुलीला...', सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी विधानसभेत व्हिडीओ बॉम्ब टाकल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस त्यांनी केला होता. विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण (Pravin Chavan) यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) दिला होता.

आता यानंतर प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात गिरीश महाजन यांनी तक्रार दाखल केली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस स्थानकात या तक्रारीची नोंद झाली आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा नेतेमंडळी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

girish mahajan
'बाळासाहेबांच्या न्यायाचा धडा घेत CM ठाकरे राजीनामा देणार का?'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com