वारकरी वेशात येऊन आमदार गजभियेंकडून भिडेंचा निषेध

मंगळवार, 10 जुलै 2018

गजभिये यांच्यासोबत आमदार नरहरी झिरवळ हे होते. या दोघांनीही अभंग गात विधानभवन परिसरात दिंडीचे स्वरूप आणले. ज्ञानबा तुकाराम महाराष्ट्राची शान, नही सहेंगे संतो का अपमान.. असा फलक घेवून या दोन्ही आमदारांनी संभाजी भिडे यांचा निषेध केला.

नागपूर : मनुस्मृतीचे समर्थक संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांची तुलना मनुशी केल्याचा निषेध करत आमदार प्रकाश गजभिये वारकरी वेशात विधान भवनात अवतरले. त्यांनी भजन म्हणून आंदोलन केले.

गजभिये यांच्यासोबत आमदार नरहरी झिरवळ हे होते. या दोघांनीही अभंग गात विधानभवन परिसरात दिंडीचे स्वरूप आणले. ज्ञानबा तुकाराम महाराष्ट्राची शान, नही सहेंगे संतो का अपमान.. असा फलक घेवून या दोन्ही आमदारांनी संभाजी भिडे यांचा निषेध केला.

प्रकाश गजभिये यांनी नुकतेच विधानभवनात संभाजी भिडे यांच्या वेशात जाऊन आंदोलन केले होते. भिडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू एक पाऊल पुढे असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तपासणी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: MLA Prakash Gajbhiye criticize Sambhaji Bhide