फडणवीसांच्या सभेला जाताना आमदार राम सातपुतेंच्या गाडीला अपघात

ram satpute
ram satputesakal media

सोलापूर : भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. टेंभूर्णी येथील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला जाताना हा अपघात घडल्यासे सांगितले जात आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नसून आमदार सातपूते आणि त्यांचे सहकारी सुखरुप आहेत. तसेच हे सर्वजण दुसऱ्या गाडीने फडणवीस यांच्या सभेसाठी टेंभूर्णी येथे रवाना झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सातपुते आणि त्यांचे सहकारी फडणवीस यांच्या सभेसाठी निघाले होते. त्यावेळी पुणे-पंढरपूर मार्गावरील वेळापूर याठिकाणी अचानक टॅक्ट्रर आडवा आल्याने आमदार राम सातपुते यांच्या गाडीचा अपघात झाला. मात्र सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसून आमदार सातपूते आणि त्यांचे सहकारी सुखरुप आहेत. सर्व जण दुसऱ्या गाडीने टेंभूर्णीला सभेसाठी रवाना झाले आहेत.

राम सातपुते आणि त्यांचे सहकारी टेंभुर्णी येथील रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या 'जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा' या यात्रेची सांगता होणार असून, याचा समारोप फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी जात असताना सातपुतेंच्या गाडीला अपघात झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com