आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

आमदार रमेश कदम यांना मुंबई हायकोर्टाने आज दिलासा दिला.

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये मागील अडीच वर्षांपासून कारागृहात असलेल्या आमदार रमेश कदम यांना मुंबई हायकोर्टाने आज दिलासा दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. लोकशाहिर अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळाचे कदम अध्यक्ष होते. ईडीने त्यांच्या विरोधात आथिर्क गैरव्यवहाराचा आरोप केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ramesh Kadam granted bail