
Ravindra Dhangekar : "माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मुख्यमंत्री भेटले याचा मला आनंद"
कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. आपल्या शपथविधीनंतर धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या मतदारसंघातल्या लोकांना मुख्यमंत्री येऊन भेटले, याचा मला आनंद आहे, असं रविंद्र धंगेकर म्हणाले.
माध्यमांशी बोलताना रविंद्र धंगेकर म्हणाले, "माझ्या ताकदीचा अंदाज आला म्हणून सगळं मंत्रिमंडळ प्रचारात येऊन थांबलं. इथंच माझा विजय झाला. माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मुख्यमंत्री येऊन भेटले याचा मला आनंद आहे." धंगेकर यांनी राज ठाकरे यांच्या भेटीबद्दलही सांगितलं आहे.
रविंद्र धंगेकर पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. प्रचारादरम्यानही त्यांनी पुण्यातल्या मनसेच्या शाखेला भेट दिली. तिथे मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागतही केलं होतं. आता निवडून आल्यानंतर धंगेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे दिलदार माणूस, त्यांना भेटल्यावर मला शब्दच फुटत नव्हते, असंही धंगेकर म्हणाले.