Aditya Thackrey: 'आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील', आमदाराचा रश्मी ठाकरेंना शब्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackrey

Aditya Thackrey: 'आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील', आमदाराचा रश्मी ठाकरेंना शब्द

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. सत्तापालट झाली. त्यानंतर राज्याच राजकारण ढवळून निघाल आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हं त्याचबरोबर राज्यातील सत्ता देखील गेली. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार, मंत्री, खासदार, कार्यकर्ते जोमाने लढताना दिसत आहेत.

अशातच माजी पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा शब्द विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी आदित्य यांच्या आई रश्मी ठाकरे यांना दिला आहे. ठाकरे गटाच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने काल वरळीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य केलं आहे.

“रश्मी वहिनी तुम्ही कार्यक्रमाला आलात. ही वरळी शिवसेनेची आहे. ही वरळी उद्धव ठाकरे यांची आहे. ही वरळी आदित्य ठाकरे यांचीच असेल. वहिनी मी तुम्हाला शब्द देतो की, आदित्य ठाकरे इथूनच मुख्यमंत्री होतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर याच मंचावर आम्ही त्यांचा सत्कार करु”, असं सुनील शिंदे यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरेंनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळी ते म्हणाले की, अजून मंत्रिमंडळात एकही महिला नाही याची खंत आहे. टीव्हीवर मंत्र्यांकडून महिलांचा अपमान केला जात आहे. महिलांना शिव्या देणारे देखील मंत्रिमंडळात असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.